कधी कधी आपण मोबाईल खरोखर बंद करायला इच्छुक नसतो, पण मित्रांना किंवा कॉल करणाऱ्यांना “नंबर स्विच ऑफ आहे” असा मेसेज ऐकवायचा असतो. यासाठी एक मजेशीर उपाय आहे – कॉलरट्यून/हेलोट्यून!
फक्त तुमच्या सिम कंपनीच्या Appमध्ये जाऊन योग्य कॉलरट्यून सेट केली, की समोरच्या व्यक्तीला तुमचा मोबाईल बंद असल्याचा भास होईल. चला पाहूया Jio, Airtel आणि Vi सिम वापरणाऱ्यांसाठी हे कसं करायचं.
Jio वापरणाऱ्यांसाठी – JioSaavn App
Jio युजर्सना कॉलरट्यून सेट करण्यासाठी JioSaavn App वापरावं लागतं.
प्रोसेस अगदी सोपी आहे:
तुमच्या मोबाईलमध्ये JioSaavn App इन्स्टॉल करा.
App उघडून Callertune या सेक्शनमध्ये जा.
सर्च बॉक्समध्ये “Switched Off” टाइप करा.
लिस्टमध्ये आलेल्या ट्यूनमधून तुमच्या पसंतीचा पर्याय निवडा.
Set as Callertune वर क्लिक करा.
यापुढे कोणीही तुमच्या Jio नंबरवर कॉल केल्यास त्यांना “Number is switched off, please try again later” असा आवाज ऐकू येईल.
Vi (Vodafone-Idea) वापरणाऱ्यांसाठी – Vi App
Vi यूजर्स साठी प्रोसेस जिओ आणि एअरटेलसारखीच आहे.
- मोबाईलमध्ये Vi App डाउनलोड करून उघडा.
- Callertune / Hello Tunes सेक्शनमध्ये जा.
- सर्चमध्ये “Switched Off” लिहा.
- लिस्ट मधून तुमची ट्यून निवडा.
- Set as Callertune वर क्लिक करा.
आता तुमच्या Vi नंबरवर कोणी कॉल केल्यास ते समजतील की मोबाईल बंद आहे.
Airtel वापरणाऱ्यांसाठी – Airtel Thanks App
- Airtel सिममध्ये Hello Tunes फीचर उपलब्ध आहे.
- तुमच्या मोबाईलमध्ये Airtel Thanks App डाउनलोड करा.
- Appमध्ये लॉगिन करून Set Hello Tune पर्यायावर क्लिक करा.
- सर्च बॉक्समध्ये “Switched Off” लिहा हवी असलेली ट्यून निवडा.
- Set करून सेव्ह करा.
असं केल्यानंतर तुमच्या Airtel नंबरवर कॉल करणाऱ्याला मोबाईल बंद असल्यासारखा आवाज ऐकू येईल.
मोबाईल खरोखर बंद न करता त्याला बंद असल्यासारखं दाखवायचं असेल, तर हा सोपा उपाय जरूर वापरून बघा. फक्त तुमच्या सिम कंपनीच्या Appमध्ये “Switched Off” कॉलरट्यून शोधा आणि सेट करा. मग तुम्ही ऑनलाईनही राहाल आणि समोरचा समजेल की मोबाईल बंद आहे!